-
मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे सध्या कोकणात तिच्या गावी पोहोचली आहे.
-
सोनाली तिची लेक सनायाबरोबर कोकण भ्रमंती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या मायलेकी गुहागरला गेल्या आहेत.
-
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरचा समुद्रकिनारा हा कोकणातील सर्वात स्वच्छ, शांत आणि निसर्गरम्य किनाऱ्यांपैकी एक आहे. या समुद्रकिनारी सोनालीने सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
याशिवाय अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये कोकणातील संस्कृतीची झलक पाहायला मिळतेय.
-
एप्रिल आणि मे महिना हा कोकणात फणसाचा मुख्य हंगाम असतो. या काळात रसाळ (बरका) आणि कापा फणस मिळतात. याचाही फोटो सोनालीने शेअर केला आहे.
-
नारळ-सुपारीच्या बागा, निसर्गरम्य वातावरण, कौलारू घर…एकंदर कोकणातील जीवनशैलीची झलक सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय.
-
याशिवाय सोनालीने गुहागरच्या गावच्या मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेतलं.
-
लेक सनायाबरोबरचा समुद्रकिनारी काढलेला Cute फोटो सुद्धा सोनालीने शेअर केला आहे.
-
“साध्या गोष्टी अन् साधं जीवन” असं कॅप्शन सोनालीने तिने शेअर केलेल्या फोटोंना दिलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : सोनाली खरे इन्स्टाग्राम )
Raghav Chadha To Join BJP AAP Split: राघव चड्ढा यांचा ‘आप’ला रामराम, दोन तृतीयांश खासदारांसह भाजपामध्ये प्रवेश करणार; केजरीवालांना मोठा धक्का