-
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची कन्या अभिनेत्री रुमानी खरे सध्या आपल्या ‘हनिमून’ ट्रीपचा आनंद घेत आहे.
-
८ मार्च रोजी अभिनेता स्तवन शिंदेसोबत विवाहबंधनात अडकल्यानंतर रुमानी सध्या बालीच्या निसर्गरम्य वातावरणात फिरत आहे.
-
रुमानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती समुद्राच्या अथांग किनारी फेरफटका मारताना दिसत आहे.
-
या फोटोंना तिने ‘before the storms,In between the rains’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
एका फोटोमध्ये ती पावसात स्विमिंग पूलचा आनंद घेताना दिसत आहे.
-
समुद्रकिनारी वाळूत चालतानाचा तिचा साधेपणा आणि चेहऱ्यावरील आनंद तिच्या फोटोंमधून स्पष्टपणे ओसंडून वाहत आहे.
-
बालीच्या निळ्याशार पाण्याचा आणि हिरवळीचा आनंद घेताना रुमानी आणि स्तवनचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो साभार- रुमानी खरे इन्स्टाग्राम)
Arvind Kejriwal : राघव चड्ढा यांच्यासह ‘आप’चे ७ खासदार भाजपात जाणार; केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; “भाजपाकडून…”