-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तनुज गोवळकरबरोबर (Tanuj Govalkar) विवाहगाठ बांधली.
-
लग्नानंतर हे नवदंपती हनिमूनसाठी कर्नाटकातील (Karnataka) ऐतिहासिक हंपी (Hampi) येथे गेले होते.
-
या सहलीचे काही खास फोटो अपूर्वा आणि तनुजने सोशल मीडियावर शेअर केले असून सध्या त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
हे फोटो शेअर करताना अपूर्वाने “काही प्रवास नियोजित नसून, फक्त अनुभवायचे असतात…” असे भावूक कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री आणि हंपीचा नयनरम्य परिसर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले हंपी हे १५ व्या शतकातील विजयनगर साम्राज्याची राजधानी होते.
-
जागतिक वारसा स्थळांच्या (UNESCO World Heritage Site) यादीत हंपीला मानाचे स्थान आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
Kalyan Dombivli Rickshaw: युपी, बिहारमधून काल आले आणि आज कल्याण डोंबिवलीत रिक्षा चालवायला लागले; परप्रांतीयांना शासकीय दाखले मिळणे सोपे