-
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) सध्या झी मराठीवरील ‘तारिणी’ (Taarini TV Serial) या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
या मालिकेत ती ‘कौशिकी खांडेकर’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे.
-
अभिनयाबरोबरच आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिज्ञाने नुकतेच रेट्रो लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अभिज्ञाने ब्लॅक अँड व्हाईट पोलका डॉट स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.
-
हा रेट्रो लूक पूर्ण करण्यासाठी अभिज्ञाने हलका मेकअप आणि आकर्षक हेअरस्टाईलवर भर दिला आहे.
-
अभिनेत्री मयुरी देशमुखने ‘Loveeeeeee’ अशी कमेंट करत अभिज्ञाच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
-
आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
Kalyan Dombivli Rickshaw: युपी, बिहारमधून काल आले आणि आज कल्याण डोंबिवलीत रिक्षा चालवायला लागले; परप्रांतीयांना शासकीय दाखले मिळणे सोपे