-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शाल्व किंजवडेकर याचा आज वाढदिवस असून, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
शाल्वची पत्नी श्रेया डफळापूरकर हिने खास पोस्ट शेअर करीत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
या पोस्टमध्ये श्रेयाने दोघांचे रोमँटिक आणि मजेशीर फोटो शेअर करून, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
श्रेयाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘Happiesttttt birthdayyy shaluuuu, You are my definition of love. You’ll always keep being definition to all my happy words. You make everything worth ♥️ Also Coming to irritate you in 3…2…1..’
-
शाल्वने ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील ओमकारच्या भूमिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली.
-
श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या दोघांमधील केमिस्ट्री आणि प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
आपल्या लाडक्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
शाल्व आणि श्रेयाची ही गोड जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य: श्रेया डफळापूरकर/इन्स्टाग्राम)
विशाल कोटियनचे राखी सावंतबद्दल वक्तव्य; म्हणाला, “झोपल्यानंतर आणि सकाळी उठण्याआधीच…”