-
मराठी कलाविश्वातील लाडकी अभिनेत्री गायत्री दातार (Gaytri Datar) लवकरच श्रीकांत चवरेबरोबर (Shrikant Chavare) विवाहबंधनात अडकणार आहे.
-
नुकताच गायत्रीचा मेहंदी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
-
या मेहंदी सोहळ्याचे काही खास फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
या खास दिवसासाठी गायत्रीने हिरव्या रंगाचा अत्यंत सुरेख ड्रेस परिधान केला होता.
-
केसांची आकर्षक स्टाईल आणि मिनिमल मेकअपमुळे गायत्रीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
तर दुसरीकडे, श्रीकांतनेही गायत्रीला साजेसा असा कुर्ता आणि जॅकेट परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
‘मेहंदी रंगली गं…’ असे कॅप्शन देत गायत्रीने या सोहळ्याची एक खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गायत्री दातार/इन्स्टाग्राम)
८६ वर्षीय अभिनेते आर्थिक अडचणीत? व्हायरल व्हिडीओनंतर अमिताभ बच्चन मदतीसाठी धावल्यावर पत्नी म्हणाली…