-
समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘सूपर डुपर’ (Super Duperr Movie) हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कलाकार, म्हणजेच लाडका अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) यांच्या एका नव्या फोटोशूटने सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोशूटसाठी नम्रताने निळ्या रंगाची अत्यंत सुंदर अशी प्रिंटेड कॉटन साडी परिधान केली आहे.
-
कुशलने राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि पांढरी पॅन्ट असा कॅज्युअल लूक करत नम्रताला उत्तम साथ दिली आहे.
-
हे फोटो शेअर करताना कुशलने आपल्या खास शैलीत एक पोस्ट लिहिली आहे. तो म्हणतो, “कुणी निंदा कुणी वंदा, आमचा हसविण्याचा धंदा! इतरांच्या सिनेमाचे प्रमोशन करता करता, आज आम्ही स्वतःच्या सिनेमाचे प्रमोशन करत आहोत. हे म्हणजे लग्न लावून देणाऱ्या भटजीने स्वतःचे लग्न लावण्यासारखे आहे किंवा एखाद्या डॉक्टरने स्वतःलाच टाके घालण्यासारखे आहे! काहीही असले तरी आमचा ‘सूपर डुपर’ सिनेमा चित्रपटगृहात यशस्वीपणे सुरू आहे, तो नक्की पाहा.”
-
‘सूपर डुपर’ या चित्रपटातील कलाकारांच्या केमिस्ट्रीने आणि विनोदी टायमिंगने चित्रपटात एक वेगळीच रंगत आणली आहे.
-
सोशल मीडियावर या जोडीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या ‘सूपर डुपर’ प्रवासाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कुशल बद्रिके/इन्स्टाग्राम)
८६ वर्षीय अभिनेते आर्थिक अडचणीत? व्हायरल व्हिडीओनंतर अमिताभ बच्चन मदतीसाठी धावल्यावर पत्नी म्हणाली…