-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali TV Serial) सध्या रंजक वळणावर असून प्रेक्षकांकडून या मालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-
नुकतेच या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राप्ती रेडकरने (Prapti Redkar) सेटवरील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील सर्व कलाकार दाक्षिणात्य पेहरावात (South Indian Look) दिसत आहेत.
-
या मालिकेच्या कथानकाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या मालिकेत हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.
-
रतनच्या लग्नात ओवीचा भीषण अपघात होणार असतो, परंतु सावली देवासारखी धावून येत तिला मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढते. दुसरीकडे, सारंग आणि सावली एकाच ठिकाणी असूनही त्यांची भेट होऊ शकत नाही.
-
रतनच्या कारस्थानामुळे सारंगला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. मात्र, सुशीलाला न्याय मिळवून देण्यासाठी सारंग पुन्हा गावात परततो. याच संघर्षात गुंड ओवीचा पाठलाग करतात आणि पुन्हा एकदा सावली ओवीच्या मदतीला धावून येते.
-
या संकटामुळे सावली आणि ओवीमध्ये मैत्रीचे नाते निर्माण होणार आहे. आता सारंग जेव्हा ओवीला घेण्यासाठी येईल, तेव्हा सावली आणि त्याची गाठ पडणार का? हे पाहणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
८६ वर्षीय अभिनेते आर्थिक अडचणीत? व्हायरल व्हिडीओनंतर अमिताभ बच्चन मदतीसाठी धावल्यावर पत्नी म्हणाली…