-
भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर होणारी ‘गोदा आरती’ हा केवळ धार्मिक विधी नसून सकारात्मक ऊर्जेचा एक दिव्य सोहळा आहे.
-
याच मंगलमयी वातावरणाचा अनुभव नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेतील कलाकारांनी घेतला.
-
नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड परिसरात मालिकेच्या यशासाठी या टीमने गोदावरीची मनोभावे आरती केली.
-
याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे, अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद आणि बालकलाकार अर्णव वॅरिअर उपस्थित होते.
-
संध्याकाळच्या प्रसन्न वेळी मंत्रोच्चार आणि दीपमाळांच्या लखलखाटात संपन्न झालेला हा सोहळा अत्यंत नेत्रदीपक होता.
-
आरतीच्या सुरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. याप्रसंगी कलाकारांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता आणि समाधान पाहायला मिळाले.
-
या दिव्य अनुभवाविषयी बोलताना सुनील तावडे भावूक झाले. ते म्हणाले “गोदा आरतीचा हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय आणि भावनिक आहे.”
-
“मी पहिल्यांदाच या पवित्र स्थळी आलो असून इथून परतताना एक नवी सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन जात आहे.”
-
“प्रेक्षकांचे प्रेम आणि आई गोदावरीचे आशीर्वाद आमच्या मालिकेला असेच मिळत राहावेत, हीच प्रार्थना आहे.”
-
‘बाई तुझा आशीर्वाद’ ही नवी मालिका रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
“भूषण गवईंना हे सांगणारे श्याम मानव कोण?” देवेंद्र फडणवीसांचा सवाल; धीरेंद्र शास्त्री भेटीवरून वाद