-
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘संस्कारी सून’ म्हणून ओळखली जाणारी रुबिना दिलैक सध्या तिच्या मालदीव सफरीमुळे चर्चेत आहे.
-
रुबिना तिच्या पती व जुळ्या मुलींबरोबर मालदीवला गेली आहे.
-
रुबिनाने तिच्या सुट्ट्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
रुबिनाचा मालदीवमधील बॅकलेस लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
या फोटोंमध्ये रुबिना दिलैक अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे.
-
रुबिनाच्या चाहत्यांकडून या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
नेहमी पडद्यावर साध्या भूमिकेत दिसणाऱ्या रुबिनाचा हा स्टायलिश अवतार तिच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का ठरला आहे.
-
मालदीवच्या निळ्याशार समुद्राच्या पार्श्वभूमीवर रुबिनाचे हे फोटो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
-
(सर्व फोटो – रुबीना दिलैक इन्स्टाग्राम)
Marathi Compulsory Pratap Sarnaik Love Story: “ज्या मुलीला मदत केली तीच प्रेमात पडली”, गुजराती पत्नी, मराठी भाषा आणि राजकारणावर काय बोलले मंत्री प्रताप सरनाईक?