-
झी मराठी वाहिनीवरील ‘कमळी’ (Kamali Tv Serial) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून प्रेक्षकांचा या मालिकेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबरने (Vijaya Babar) नुकतेच झारखंडमधील प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ मंदिराला (Baba Baidyanath Temple Deoghar) भेट दिली.
-
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आणि ‘बैद्यनाथ धाम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थानी विजयाने महादेवाचे दर्शन घेतले.
-
झारखंडमधील देवघर येथे स्थित असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असते.
-
यावेळी विजयाचा पारंपरिक लूक विशेष चर्चेत राहिला. तिने सोनेरी रंगाची टिशू सिल्क साडी परिधान केली होती.
-
या साडीवर विजयाने केलेला हलका मेकअप आणि सुंदर दागिन्यांनाचा साज तिचे सौंदर्य खुलवत होता.
-
विजयाने तिच्या या खास फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, चाहत्यांकडून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)
Marathi Compulsory Pratap Sarnaik Love Story: “ज्या मुलीला मदत केली तीच प्रेमात पडली”, गुजराती पत्नी, मराठी भाषा आणि राजकारणावर काय बोलले मंत्री प्रताप सरनाईक?