-
आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री शिवानी सुर्वेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
‘देवयानी’ या लोकप्रिय मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे शिवानी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली.
-
मालिका आणि चित्रपटांच्या यशस्वी प्रवासानंतर शिवानीने ‘बिग बॉस’च्या घरातही आपल्या हटके अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधले होते.
-
सध्या शिवानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या नवीन फोटोंमुळे चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
-
या फोटोंमध्ये तिने परिधान केलेली लाल रंगाची साडी आणि डोक्यावर घेतलेली ओढणी तिच्या सौंदर्याला चारचाँद लावत आहे.
-
कपाळावर मोठी टिकली आणि नाकात पारंपरिक नथ अशा मराठमोळ्या लूकला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे.
-
शिवानीच्या या फोटोंमधील गंभीर मुद्रा आणि भावूक डोळे तिच्या या लूकला अधिक प्रभावी बनवत आहेत.
-
अभिनयाचा उत्तम वारसा जपत शिवानी सध्या विविध दर्जेदार चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: शिवानी सुर्वे/इन्स्टाग्राम)
Raghav Chadha : “माझ्याकडे फक्त तीनच पर्याय होते”, राघव चड्ढांचं मोठं वक्तव्य; ‘आप’ सोडण्याची अन् भाजपा प्रवेशाची सांगितली कारणं