-
मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निवेदिका म्हणून मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) नेहमीच चर्चेत असते.
-
मालिका असो वा दर्जेदार चित्रपट, आपल्या विविधांगी भूमिकांनी मृण्मयीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
-
नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यासाठी मृण्मयीने केलेला खास लूक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या सोहळ्यासाठी मृण्मयीने लाल रंगाची सिल्क साडी नेसली होती, ज्यावर तिने एम्ब्रॉयडरी असलेला डिझायनर ब्लाऊज मॅच केला होता.
-
या साडीतील सौंदर्याला अधिक खुलवण्यासाठी तिने आकर्षक दागिन्यांची निवड केली होती.
-
केसांची नेटकी हेअरस्टाईल आणि ‘मिनिमल’ मेकअपमुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली होती.
-
प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका दिपाली विचारे यांनी या फोटोंवर ‘सुंदरी माझी’ अशी कमेंट करत मृण्मयीचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)
Raghav Chadha : “माझ्याकडे फक्त तीनच पर्याय होते”, राघव चड्ढांचं मोठं वक्तव्य; ‘आप’ सोडण्याची अन् भाजपा प्रवेशाची सांगितली कारणं