-
‘तुला पाहते रे’ फेम मराठी अभिनेत्री गायत्री दातार लग्नबंधनात अडकली.
-
गायत्री दातारने श्रीकांत चवरेबरोबर खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली.
-
गायत्री व श्रीकांतच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
-
निसर्गाच्या सानिध्यात गायत्री व श्रीकांत यांनी लग्न केलं.
-
गायत्री दातारच्या लग्नाला सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी हजेरी लावली.
-
मिताली मयेकरने लग्नात करवलीची जबाबदारी पार पाडली.
-
गायत्री दातारच्या मंगळसूत्राच्या डिझाइनने लक्ष वेधून घेतले.
-
दोन वाट्यांचे मंगळसूत्र गायत्रीच्या गळ्यात अत्यंत सुंदर दिसत होते.
-
गायत्री दातार व श्रीकांतला वैवाहिक जीवनासाठी चाहते शुभेच्छा देत आहेत. (फोटो- गायत्री दातारच्या व्हिडीओतून स्क्रीनशॉट)
“नवरा म्हातारा झालाय अन् तू…”, ऐश्वर्या नारकरांनी ट्रोल करणाऱ्याला चांगलंच सुनावलं; म्हणाल्या, “हिंदू राष्ट्राची लाज…”