-
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रेवती लेले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
तिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले असून ते चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
या फोटोंमध्ये रेवती व्हिएतनामच्या निसर्गरम्य हॅलोंग बे (Ha Long Bay) परिसरात फिरताना दिसत आहे.
-
रेवतीने या खास सहलीसाठी पांढऱ्या रंगाचा अतिशय स्टायलिश ‘पोल्का डॉट’ वन पीस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमध्ये ती अतिशय ग्लॅमरस आणि मोहक दिसत असून तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
तिच्या या पाश्चात्य पेहरावासोबतच गळ्यातील नाजूक मंगळसूत्राने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
-
तिच्या पाठीमागे व्हिएतनामचे निळे पाणी आणि डोंगररांगांचा निसर्गरम्य देखावा उठून दिसत आहे.
-
चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रेवती लेले/इन्स्टाग्राम)
“नवरा म्हातारा झालाय अन् तू…”, ऐश्वर्या नारकरांनी ट्रोल करणाऱ्याला चांगलंच सुनावलं; म्हणाल्या, “हिंदू राष्ट्राची लाज…”