-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या तिच्या आगामी ‘मटका किंग’ (Matka King Web Series) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
-
ही सीरिज १७ एप्रिल २०२६ रोजी ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’वर प्रदर्शित झाली असून, त्यात सईने साकारलेली ‘बरखा’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
प्रदर्शनाच्या निमित्ताने सईने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत, जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
सईने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या प्रिंटेड साडीत दिसत आहे.
-
या लूकला सईने ‘Queen Of Hearts’ असे कॅप्शन दिले असून, तिच्या चाहत्यांनी या फोटोंवर पसंतीचा वर्षाव केला आहे.
-
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेली ही सीरिज मुंबईतील एके काळचा प्रसिद्ध मटका किंग रतन खत्री याच्या आयुष्यावर आधारित आहे.
-
या सीरिजमध्ये सईबरोबरच विजय वर्मा, क्रितिका कामरा, गुलशन ग्रोव्हर, किशोर कदम, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि गिरीश कुलकर्णी यांसारख्या तगड्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
“नवरा म्हातारा झालाय अन् तू…”, ऐश्वर्या नारकरांनी ट्रोल करणाऱ्याला चांगलंच सुनावलं; म्हणाल्या, “हिंदू राष्ट्राची लाज…”