-
‘सावळ्याची जणू सावली’फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवी सध्या आपल्या कोकणातील गावी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
मालिकेत ‘तारा’ ही भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले असून तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
सावंतवाडी येथील गावी एका खास घरगुती कार्यक्रमासाठी भाग्यश्री पोहोचली असल्याचे फोटोंवरून स्पष्ट होत आहे.
-
तिने शेअर केलेल्या फोटोंना “आमच्या बंटीचा लगीन” अशी मजेशीर कॅप्शन दिली आहे.
-
मुक्काम पोस्ट तळवडे, सावंतवाडी अशा पत्त्यासह तिने आपल्या मातीतील आठवणींना उजाळा दिला आहे.
-
एका फोटोमध्ये ती ‘सावंतवाडी रोड’ रेल्वेस्थानकावर आनंदाने पोझ देताना दिसत आहे
-
हळदीच्या कार्यक्रमातील फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाची साडी आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
-
गावाकडच्या वातावरणात रमलेली ‘तारा’ पाहून तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: भाग्यश्री दळवी/इन्स्टाग्राम)
“नवरा म्हातारा झालाय अन् तू…”, ऐश्वर्या नारकरांनी ट्रोल करणाऱ्याला चांगलंच सुनावलं; म्हणाल्या, “हिंदू राष्ट्राची लाज…”