-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी शिवानी सोनार (Shivani Sonar) आणि अंबर गणपुळे (Ambar Ganpule) सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहेत.
-
लग्नानंतरही ही जोडी आपल्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकत आहे.
-
नुकतेच शिवानीने अंबरबरोबरचे काही खास रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानी आणि अंबरचा पारंपारिक अंदाज पाहायला मिळत आहे.
-
शिवानीने गडद निळ्या रंगाची नक्षीदार माहेश्वरी साडी परिधान केली असून, त्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
अंबरने लाल रंगाचा शिमरी कुर्ता आणि काळ्या रंगाचे धोतर असा रॉयल पेहराव केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना शिवानीने याला ‘सोबती’ असे छोटेखानी पण अर्थपूर्ण कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
“नवरा म्हातारा झालाय अन् तू…”, ऐश्वर्या नारकरांनी ट्रोल करणाऱ्याला चांगलंच सुनावलं; म्हणाल्या, “हिंदू राष्ट्राची लाज…”