-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ (Tula Japnar Aahe TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
या मालिकेत ‘मीरा’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमी म्हात्रे (Mahima Mhatre) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
महिमाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये महिमाने परिधान केलेल्या जांभळ्या रंगाच्या सिल्क साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या पारंपरिक लूकवर महिमाने अतिशय मोजक्या दागिन्यांची निवड केली आहे.
-
काही दिवसांपूर्वीच महिमाचा साखरपुडा अभिनेता रोशन विचारेशी (Roshan Vichare) मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
रोशननेदेखील अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : महिमा म्हात्रे/इन्स्टाग्राम)
नागपूर-गोवा एक्सप्रेस आता कायमस्वरूपी! २४ डब्यांची एक्सप्रेस आणि प्रमुख शहरांचे थांबे; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक