-
बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने आपल्या दर्जेदार अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
मृणालचा नुकताच ‘डकैत: अ लव्ह स्टोरी’ (Dacoit: A Love Story) हा नवा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
-
अभिनयासोबतच मृणाल तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस आणि पारंपरिक लूकमुळे नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
-
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने जांभळ्या रंगाची सुंदर किनार असलेली गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.
-
या पारंपरिक लूकवर तिने गळ्यात खड्यांचा चोकर, कानात मोठे जड कर्णफुले आणि हातात नक्षीदार बांगड्या असा साज केला आहे.
-
विशेषतः केसांचा आंबाडा घातल्यामुळे मृणालचा हा मराठमोळा साज आणि सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.
-
साडीतील तिच्या या मोहक अदांवर चाहते घायाळ झाले असून इंटरनेटवर सध्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)
शिवसेना शिंदे पक्षाकडून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी तर बच्चू कडू यांना विधानपरिषेदेची लॉटरी ?