-
Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: आयपीएल २०२६ चा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे. बुधवारी (२९ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली.
-
या सामन्यात मुंबईने २४३ धावांचा डोंगर उभारला होता, मात्र हैदराबादने हे कठीण आव्हान १८.४ षटकांत पूर्ण करत विजय मिळवला.
-
हा सामना पाहण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार वानखेडेवर उपस्थित होते.
-
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रार्थनाबरोबर पती अभिषेक जावकर, अभिनेत्री सना शिंदे, काजल काटे, प्रतीक कदम आणि पुष्कर जोग दिसत आहेत.
-
सामन्यातील पराभवानंतरही प्रार्थनाने मुंबई इंडियन्सला खंबीर पाठिंबा दिला आहे.
-
प्रार्थनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी मुंबईकर आहे आणि मला मुंबई इंडियन्सचा अभिमान आहे! आज नाही जिंकलो, पण उद्या नक्की जिंकू… कारण आमच्यात ती जिद्द आहे! हार मानणं आमच्या रक्तात नाही… We Will Rise Again!”
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रार्थना बेहेरे/इन्स्टाग्राम)
शिवसेना शिंदे पक्षाकडून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी तर बच्चू कडू यांना विधानपरिषेदेची लॉटरी ?