-
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे (Sonali khare) सध्या तिच्या परदेश दौऱ्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
-
सोनाली सध्या थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून तिथले तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
या सहलीमध्ये सोनालीसोबत तिचा पती बिजय आनंद आणि मुलगी सनाया हेदेखील असून ते फॅमिली ट्रिपचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.
-
थायलंडमधील निसर्गरम्य कोह सामुई बेटावर नारंगी रंगाच्या आउटफिटमधील सोनालीचा लूक अतिशय देखणा दिसत आहे.
-
एका फोटोमध्ये ती रात्रीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेलमध्ये बसून तिथल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेताना दिसत आहे.
-
दुसऱ्या एका फोटोत तिने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर टॉप परिधान केला असून आपल्या लाडक्या मुलीसोबत तिने सुंदर सेल्फी शेअर केला आहे.
-
या फोटोंना तिने ‘Life in #kohsamui’ अशी कॅप्शन दिली असून तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
तिच्या या कौटुंबिक सहलीचे आणि बेटावरील फिरण्याचे फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली खरे/इन्स्टाग्राम)
शिवसेना शिंदे पक्षाकडून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी तर बच्चू कडू यांना विधानपरिषेदेची लॉटरी ?