-
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेली आणि बहुचर्चित ठरलेली ‘मटका किंग’ (Matka King Web Series) ही वेब सीरिज सध्या प्राइम व्हिडिओवर धुमाकूळ घालत आहे.
-
१७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या सीरिजने प्रेक्षकांची मने जिंकली असून, आता अभिनेत्री सई ताम्हणकरने सेटवरील काही पडद्यामागचे (BTS) खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या सीरिजमध्ये सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) ‘बरखा’ नावाचे दमदार पात्र साकारले आहे.
-
सईने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा १९६० च्या दशकातील लूक आणि सेटवरील वातावरण पाहायला मिळत आहे.
-
सईच्या अभिनयाबरोबरच तिच्या या रेट्रो लूकचेही प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
-
‘मटका किंग’मध्ये केवळ सईच नाही, तर सिद्धार्थ जाधव, गिरीश कुलकर्णी आणि भरत जाधव यांसारख्या दिग्गज मराठी कलाकारांची फौज एका हिंदी सीरिजच्या निमित्ताने एकत्र आली आहे.
-
नागराज मंजुळे यांच्या खास शैलीतील दिग्दर्शन आणि मराठी कलाकारांच्या अभिनयामुळे या सीरिजला सोशल मीडियावर मोठी पसंती मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
शिवसेना शिंदे पक्षाकडून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी तर बच्चू कडू यांना विधानपरिषेदेची लॉटरी ?