-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लपंडाव’ (Lapandav TV Serial) या मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
-
या मालिकेत ‘तेजस्विनी कामत’ ही दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) सध्या तिच्या एका खास लूकमुळे आणि यशामुळे चर्चेत आली आहे.
-
नुकताच मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘२८ वा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०२६’ सोहळा दिमाखात पार पडला.
-
चंद्रशेखर सांडवे प्रस्तुत या सोहळ्यात मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका विश्वातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला.
-
या सोहळ्यात रुपाली भोसलेच्या अभिनयाची मोहोर उमटली असून, ‘लपंडाव’ मालिकेतील ‘तेजस्विनी’ या भूमिकेसाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट खलनायक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
गेल्या २८ वर्षांपासून कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या या व्यासपीठावर पुरस्कार मिळाल्याने रुपालीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी रुपालीने नेसलेल्या आकाशी रंगाच्या नक्षीदार पैठणी साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
७७ वर्षांचा वनवास संपला! जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा बीनागुंडा दौरा ऐतिहासिक का? जाणून घ्या