-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री धनश्री काडगांवकर (Dhanashri Kadgaonkar) सध्या आपल्या कामातून ब्रेक घेत थायलंडमध्ये (Thailand Vacation) सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
-
धनश्रीच्याबरोबर तिचे सहकलाकारदेखील या सहलीचा आनंद घेताना दिसत आहेत.
-
धनश्रीने या सफरीचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, ते सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
थायलंडच्या निळ्याशार समुद्राचा आणि पांढऱ्या वाळूचा आनंद घेताना धनश्रीने हिरव्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
धनश्रीच्या या स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
धनश्रीने या फोटोंना ‘Thailand Baby’ असे कॅप्शन दिले असून, तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
थायलंड हे आग्नेय आशियातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगांवकर/इन्स्टाग्राम)
७७ वर्षांचा वनवास संपला! जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा बीनागुंडा दौरा ऐतिहासिक का? जाणून घ्या