-
इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे भाऊ-बहीण, आई-वडील, पती-मुलगा-मुलगी-बायको किंवा इतर नातेवाईकही मनोरंजनसृष्टीत काम करतात.
-
त्यामध्ये मीरा व मधुरा वेलणकर या बहिणी, त्यांचे वडील प्रदीप वेलणकर तसेच मधुरा वेलणकरचे सासरे हे शिवाजी साटम आहेत.
-
असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे जवळचे नातेवाईक याच इंडस्ट्रीमध्ये काम करतात. पण, अगदी मोजक्याच वेळा त्यांना एकाच मालिकेत, चित्रपटात, नाटकात किंवा वेब सीरिजमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळते.
-
एक अभिनेत्री व तिच्या दोन जुळ्या मुली एकाच मालिकेत काम करत आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का?
-
लागिरं झालं जी या मालिकेत मामी या भूमिकेतून अभिनेत्री विद्या सावळेला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
-
त्यानंतर जीव झाला वेडापिसा, तसेच राजा राणीची गं जोडी, सिंधूताई माझी आई अशा लोकप्रिय ठरलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्रीने विविध भूमिका साकारल्या.
-
अभिनेत्रीच्या सर्व भूमिकांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. सध्या अभिनेत्री इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत काम करीत आहे.
-
विशेष म्हणजे अभिनेत्रीबरोबर तिच्या दोन्ही जुळ्या मुली याच मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.
-
निकिता आणि नेहा शिंदे अशी त्यांची नावे आहेत. त्या २३ वर्षांच्या आहेत. (सर्व फोटो सौजन्य: विद्या सावळे इन्स्टाग्राम)
विधानपरिषद उमेदवारीत डावलल्याने आनंद परांजपे नाराज; एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याने पक्ष प्रवेशाची चर्चा