-
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई कल्याणकर (Sai Kalyankar) सध्या आपल्या आयुष्यातील एका सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे.
-
१० मार्च २०२६ रोजी सईने एका गोड मुलीला जन्म दिला.
-
नुकताच तिच्या लाडक्या लेकीचा बारसा सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला असून, सईने याचे खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
सईने आपल्या मुलीचे नाव ‘नाभा’ असे ठेवले आहे. ‘नाभा’ या नावाचा अर्थ आकाश किंवा गगन असा होतो.
-
“नाभाचा नामकरण सोहळा” असे कॅप्शन देत सईने या सोहळ्यातील काही हृदयस्पर्शी फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सईने परिधान केलेल्या केशरी रंगाच्या साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
सई डिसेंबर २०२१ मध्ये विवाहबंधनात अडकली होती. लग्नाच्या चार वर्षांनंतर आई झाल्यामुळे तिच्या कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई कल्याणकर/इन्स्टाग्राम)
अभ्यासात खूप हुशार असतात ‘या’ मूलांकाचे लोक, गुरुच्या आशीर्वादाने होतात करिअरमध्ये यशस्वी