-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातारने (Gayatri Datar) २७ एप्रिल २०२६ रोजी श्रीकांत चवरेबरोबर (Shrikant Chavare) विवाहगाठ बांधली.
-
सध्या सोशल मीडियावर गायत्रीच्या सीमांत पूजन सोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
-
या खास विधीसाठी गायत्रीने फिकट जांभळ्या रंगाची अत्यंत देखणी सिल्क साडी नेसली होती.
-
या साडीवर गायत्रीने परिधान केलेले पारंपारिक दागिने तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते.
-
गायत्रीला साजेसा असा पेहराव श्रीकांतनेही केला होता, त्याने या सोहळ्यासाठी फिकट जांभळ्या रंगाचा कुर्ता निवडला होता.
-
लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमातील गायत्रीच्या पारंपारिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्रीवर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गायत्री दातार/इन्स्टाग्राम)
अभ्यासात खूप हुशार असतात ‘या’ मूलांकाचे लोक, गुरुच्या आशीर्वादाने होतात करिअरमध्ये यशस्वी