-
मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे (Shruti Marathe) आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते.
-
आज १ मे, म्हणजेच महाराष्ट्र दिन. संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Day 2026) हा दिवस मोठ्या उत्साहात, अभिमानाने आणि गौरवाने साजरा केला जातो.
-
या खास मुहूर्ताचे औचित्य साधत श्रुतीने एक विशेष फोटोशूट केले असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
या फोटोशूटसाठी श्रुतीने गुलाबी रंगाचा अत्यंत सुंदर डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
या पेहरावात श्रुतीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असून चाहत्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
महाराष्ट्र दिनानिमित्त आज राज्यभरात ठिकठिकाणी मराठी संस्कृती, लोककला आणि महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
-
याच जल्लोषात श्रुतीने आपल्या स्टायलिश अंदाजात चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ’! माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या १६ शाळांवर अखेर ‘प्रशासक राज’