-
आज १ मे २०२६, ‘महाराष्ट्र दिना’चे (Maharashtra Day 2026) औचित्य साधून रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) बहुप्रतीक्षित आणि भव्य चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji Movie) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
-
हा चित्रपट केवळ एक ‘बायोपिक’ नसून मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचातील एक ऐतिहासिक मानाचा तुरा मानला जात आहे.
-
सुमारे १०० कोटींच्या भव्य बजेटमध्ये साकारलेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील आजवरचा सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे.
-
रितेश देशमुखने या स्वप्नवत प्रकल्पासाठी तब्बल १० वर्षे कठोर परिश्रम घेतले आहेत.
-
केवळ मुख्य अभिनेता म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक म्हणूनही त्याने स्वराज्याचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी प्रवास अतिशय सूक्ष्म बारकाव्यांसह पडद्यावर जिवंत केला आहे.
-
या चित्रपटात महाराजांच्या केवळ युद्धकौशल्यावरच नाही, तर त्यांच्या रणनीती चातुर्यावर आणि त्यांच्या व्यक्तित्वातील भावनिक पैलूंवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. रितेशने महाराजांची भूमिका केवळ साकारली नसून ती जगली आहे, असे भासते.
-
या चित्रपटात मराठीसह बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
-
विशेष आकर्षण म्हणजे, रितेशच्या मराठी चित्रपटांमधील हक्काचा सोबती सलमान खान या चित्रपटात ‘जिवा महाला’ यांच्या भूमिकेत एका धडाकेबाज ॲक्शन सीनमध्ये झळकणार आहे.
-
चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे अजय-अतुल यांचे संगीत.
-
त्यांनी संगीतबद्ध केलेले ‘छत्रपती’ हे ‘अँथम’ गाणे आणि चित्रपटाचे पार्श्वसंगीत (BGM) प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करणारे आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रितेश देशमुख/इन्स्टाग्राम)
नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ’! माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या १६ शाळांवर अखेर ‘प्रशासक राज’