-
जिनिलीया देशमुख सध्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
जिनिलीयाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि यामध्ये महाराणी सईबाई यांची भूमिकासुद्धा साकारली आहे.
-
१ मे महाराष्ट्र दिनी आज हा चित्रपट रिलीज झाला आहे. जिनिलीयाचा यामधील मराठमोळा अंदाज अनेकांचं लक्ष वेधत आहे.
-
जिनिलीया देशमुखने अशातच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिने नेसलेली साडी आणि मंगळसूत्राने लक्ष वेधलं आहे.
-
जिनिलायाने यावेळी अहिम्सा पैठणी नेसल्याचं या पोस्टमधून म्हटलं आहे. या नकशीदार पैठणीवर तिने काही डिझाइनर आणि पारंपरिक दागिने परिधान केले आहेत.
-
अम्हिसा पैठणीवर तिने गुलाबी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. यावर तिने मोत्याचे हार आणि कानातले परिधान केलं असून कपाळावर छोटीशी टिकली लावली आहे.
-
जिनिलायने यावेळी हातातसुद्धा डिझायनर आणि रंगबीरंगी अशी अंगठी घातली आहे. तर तिच्या एका हातात तिने काळे मणी आणि हिरे असलेलं मंगळसूत्र परिधान केलं आहे. जे खूप खास आहे.
-
जिनिलायाचं हे मंगळसूत्र खास आहे कारण – यामध्ये तिचा नवरा रितेश देशमुखच्या नावाचं पहिलं अक्षर असलेलं पेंडंटसु्द्धा आहे.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ’! माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या १६ शाळांवर अखेर ‘प्रशासक राज’