-
झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ (Tarini TV Serial) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ‘कौशिकी खांडेकर’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
-
आपल्या कसदार अभिनयाने आणि अनोख्या शैलीने अभिज्ञाने मराठी कलाविश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या स्टायलिश लूक आणि साड्यांच्या हटके निवडीसाठीही अभिज्ञा नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच अभिज्ञाने स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोशूटसाठी अभिज्ञाने गडद सोनेरी आणि काळ्या रंगाचा आकर्षक ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.
-
अभिज्ञाची मैत्रीण व अभिनेत्री रेश्मा शिंदेने या फोटोंवर ‘Stunning’ अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
नर्मदा क्रूझ अपघात: कौटुंबिक सहलीतील आनंदाचे क्षण शोकांतिकेपर्यंत कसे पोहोचले? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले दुर्घटनेचे संभाव्य कारण