-
प्रियदर्शन दिग्दर्शित बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूत बंगला’ (Bhooth Bangla Movie) १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर मिथिलाच्या अभिनयापेक्षा तिच्या फोटोंची अधिक चर्चा रंगली आहे.
-
मिथिलाने नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या फॉर्मल सूटमध्ये अत्यंत रुबाबदार दिसत आहे.
-
या फोटोंना मिथिलाने ‘Suited up!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
मिथिलाचा हा ‘बॉस लेडी’ अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या निमित्ताने मिथिलाला बॉलिवूडच्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)
‘सैराट’ फेम तानाजी गळगुंडेच्या पत्नीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा, चिमुकल्याला पाहून तुम्हीही म्हणाल, “किती गोड”