-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
या मालिकेतील ‘माया’ ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) आपल्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच अश्विनीने केलेले एक नवीन फोटोशूट सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
-
या नव्या फोटोशूटसाठी अश्विनीने ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा स्टायलिश टॉप आणि पँट असा वेस्टर्न लूक परिधान केला आहे.
-
या फोटोंना अश्विनीने दिलेले कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेत आहे. “स्वतःला महत्त्व दिल्यावर रूप अधिकच खुलतं…” अशा आशयाचे कॅप्शन देत तिने सकारात्मकतेचा संदेश दिला आहे.
-
अश्विनी महांगडेने आजवर अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
-
विशेष म्हणजे, २८ एप्रिल २०२२६ रोजी तिची भूमिका असलेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
‘सैराट’ फेम तानाजी गळगुंडेच्या पत्नीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा, चिमुकल्याला पाहून तुम्हीही म्हणाल, “किती गोड”