-
प्रसिद्ध मराठी युट्युबर, गायिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वानंदी सरदेसाई हिने १९ एप्रिल २०२६ रोजी लग्नगाठ बांधली आहे
-
तिने अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली.
-
स्वानंदीने विक्रांत रामदास (Vikrant Ramdas) याच्याशी विवाह केला आहे.
-
हा विवाहसोहळा कोकणातल्या तिच्या गावी, अत्यंत साध्या आणि पारंपरिक पद्धतीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.
-
लग्नात तिने हिरव्या रंगाची नऊवारी साडी, नथ आणि पारंपारिक दागिने परिधान केले होते, तर विक्रांतने धोतर-सदरा परिधान केला होता.
-
तिचे लग्न कोकणी पद्धतीनुसार झाले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.
-
दरम्यान, तिच्या छोट्याश्या मंगळसूत्राचीही सध्या चर्चा आहे. अत्यंत साधं पण सुबक पद्धतीने तिने मंगळसूत्र घेतलं आहे.
-
दोन वाट्या अन् काळ्या मणींचं असं हे पारंपरिक मंगळसूत्र अत्यंत सुबक आहे.
-
सर्व फोटो – स्वानंदी देसाई/ Instagram
“लाज वाटली पाहिजे”, ‘भूत बंगला’च्या दिग्दर्शकाचे वक्तव्य; म्हणाले, “तब्बू अजिबात…”