-
‘बिग बॉस मराठी’फेम अभिनेत्री अनुश्री माने हिने आपल्या स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये अनुश्रीने अतिशय सुंदर असा लिंबू सरबती (Lime Green) रंगाचा शरारा ड्रेस परिधान केला आहे.
-
मोकळे सोडलेले केस आणि कपाळावरची छोटी टिकली तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
-
दागिन्यांच्या बाबतीत अनुश्रीने कानात मोठे सिल्व्हर झुमके घालून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
फोटोंमध्ये तिने दिलेली किलर पोझ पाहून चाहते घायाळ झाले असून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
-
अनुश्रीने या पोस्टला ‘नकाब भी कभी-कभी सच छुपा नहीं पाता।’ असे खास कॅप्शन दिले आहे.
-
आपल्या हटके फॅशन सेन्समुळे अनुश्री नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
बिग बॉसच्या घरापासून घराघरांत पोहोचलेली ही अभिनेत्री सध्या आपल्या या सोज्वळ लूकमुळे चर्चेचा विषय ठरली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनुश्री माने/इन्स्टाग्राम)
वडील बिस्किट घ्यायला उतरले, तेवढ्यात वंदे भारत सुटली अन् ३ वर्षांची चिमुरडी एकटीच पुण्यात पोहचली; वाचा पुढे काय झाले…