-
स्वानंदी सरदेसाई लोकप्रिय यूट्यूबर आणि गायिका आहे. ती तिच्या साधेपणासाठीसुद्धा ओळखली जाते.
-
स्वानंदी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यामार्फत ती तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते.
-
काही दिवसांपूर्वीच गायिका लग्नबंधनात अडकली. तिने विक्रांत रामदाससह लग्न केलं.
-
दोघांनी अतिशय साधेपणाने आणि मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने लग्न केल्याने त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आणि यासाठी अनेकांनी त्यांचं कौतुक केलं.
-
स्वानंदी यूट्यूबर व गायिका असून तिने २०२५मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ या चित्रपटासाठी गाणं गायलं होतं. पण, अनेकांना माहीत नसेल की स्वानंदीचा नवरासुद्धा याच क्षेत्रात काम करतो.
-
स्वानंदीचा नवरा विक्रांत रामदास हा लेखक आणि फिल्ममेकर असल्याचं त्याच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरुन कळतं. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये हे नमूद केलं आहे.
-
विक्रांतने ‘इंदिरा’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. याबद्दलची माहिती त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन मिळते.
-
स्वानंदी व विक्रांत यांनी लग्नात पारंपरिक पोषाक परिधान केला होता. स्वानंदीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती आणि सिंपल लूक पण पारंपरिक लूक केला होता.
-
तर विक्रांतनेही सदरा व धोतर परिधान केलं होतं.
-
सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
West Bengal Election Results 2026 LIVE Updates : पश्चिम बंगालमध्ये ‘खेला’? भाजपाची आघाडी; ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात काय स्थिती?