-
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
या ऐतिहासिक महापटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता रुपेश बनेने (Rupesh Bane) नुकतेच सेटवरील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना रुपेशने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तो म्हणाला, “या चित्रपटाचा एक छोटासा भाग असणे ही माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि मित्रपरिवारासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
-
“माझ्या भावना व्यक्त करायला आज शब्द अपुरे पडत आहेत. मी अत्यंत भावूक झालो असून मला तितकाच अभिमानही वाटत आहे.”
-
“तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या. जय शिवराय!”
-
१ मे रोजी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला असला, तरी प्रेक्षकांनी मात्र चित्रपटगृहांबाहेर मोठी गर्दी केली आहे.
-
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर राज्याबाहेरही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपेश बने/इन्स्टाग्राम)
West Bengal Election Results 2026 LIVE Updates : पश्चिम बंगालमध्ये भाजपा बहुमताजवळ! अनेक वर्षांनंतर डाव्यांनीही उघडलं खातं; आताचे कल काय?