-
स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag TV Serial) ही मालिका सध्या लोकप्रियतेचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे.
-
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर सातासमुद्रापार या मालिकेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
-
गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ‘सायली’च्या भूमिकेत घराघरांत पोहोचली आहे.
-
जुईने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत, जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंचे खास वैशिष्ट्य म्हणजे जुईने यात तिच्या आईची हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर जुईने डिझाइनर ब्लाऊज आणि साजेसा साजशृंगार केला असून, तिचा हा ‘एथनिक लूक’ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
दरम्यान, मालिकेत लवकरच एक रंजक वळण येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
West Bengal Election Results 2026 LIVE Updates : LIVE : भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींची ७ हजारांनी आघाडी! निकालाचा सस्पेन्स वाढला; शेवटच्या ८ फेऱ्या ठरणार ‘गेमचेंजर’