-
थलपती विजयचा टीव्हीके हा पक्ष १०८ जागांवर आघाडी मिळवत तमिळनाडूतील सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे.
-
दीड वर्षांपूर्वी थलपती विजयने अभिनय सोडून पूर्णवेळ राजकारण करणार असल्याची घोषणा केली आणि टीव्हीके पक्षाची स्थापना केली.
-
Thalapathy Vijay Education Qualification: तामिळनाडूच्या राजकारणात आज थलापती विजय नावाचे वादळ घोंघावत आहे. अवघ्या दीड वर्षांपूर्वी अभिनय सोडून पूर्णवेळ राजकारणात येण्याची घोषणा करणाऱ्या विजयच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने १०८ जागांवर आघाडी मिळवत सत्तेची समीकरणे बदलली आहेत. सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा हा सुपरस्टार खऱ्या आयुष्यात किती शिकला आहे, याबद्दल चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे.
-
तमिळ सुपरस्टार आणि राजकारणी थलपती विजय याचे शिक्षण बारावीपर्यंत (HSC) झाले आहे.
-
विजयने त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण चेन्नईतील फातिमा मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल आणि बाललोक मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल इथून पूर्ण केले.
-
विजयने १९८९ आणि १९९१ मध्ये अनुक्रमे १० वी आणि १२ वीचे शिक्षण पूर्ण केले.
-
त्यानंतर विजयने चेन्नईतील प्रसिद्ध लोयोला कॉलेजमध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशन या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता.
-
मात्र, अभिनयाची आवड आणि चित्रपटांच्या शूटिंगमुळे त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले नाही.
-
विजयने वयाच्या १८ व्या वर्षीच मुख्य अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. (सर्व फोटो- थलपती विजय इन्स्टाग्राम)
West Bengal Election Results 2026 LIVE Updates : भवानीपूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! TMC एजंटला बाहेर काढल्याचा आरोप, ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी मतमोजणी केंद्रात दाखल