-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांना ओळखलं जातं. ‘बालक पालक’, ‘नटरंग’, ‘टाइमपास’ अशा दर्जेदार कलाकृतींचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. रवी जाधव यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईपासून दूर अलिबाग येथे सुंदर असं फार्महाऊस खरेदी केलं.
-
रवी जाधव यांचं हे फार्महाऊस निसर्गरम्य परिसरात आहे. फार्महाऊसच्या चारही बाजूला हिरवीगार झाडं आहेत.
-
प्रशस्त बाल्कनी, बंगल्यात सुंदर झोपाळा, आजूबाजूला झाडं आणि दरवाजाच्या अगदी समोर असलेलं तुळशी वृंदावन प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. रवी जाधव यांनी फोटो शेअर करत त्यांच्या फार्महाऊसची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
-
याशिवाय या फार्महाऊसजवळच्या मोकळ्या जागेत दिग्दर्शकाने सुंदर असा शेतमळा देखील फुलवला आहे.
-
रवी जाधव यांनी फार्महाऊस परिसरात वांगी, केळी, आंबे, अननस, पेरू, फणस अशा बऱ्याच फळांची अन् भाज्यांची लागवड केली आहे.
-
रवी जाधव यांच्या पत्नीने या संपूर्ण शेतमळ्याची झलक चाहत्यांना फोटो शेअर करत दाखवली आहे.
-
रवी जाधव यांनी या फोटोंना “मेहनत के फल” असं कॅप्शन दिलं आहे. याशिवाय या फार्महाऊसच्या आजूबाजूला सुंदर फुलांची झाडं देखील पाहायला मिळत आहेत.
-
रवी जाधव यांनी शेअर केलेले फोटो पाहून मराठी कलाकारांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, सुकन्या मोने या सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं आहे.
-
दरम्यान, रवी जाधव यांचं हे फार्महाऊस अलिबाग येथील नागाव परिसरात आहे. “आम्ही जेव्हा-जेव्हा याठिकाणी भेट देतो तेव्हा मनाला शांती मिळते आणि नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते” असं रवी जाधव यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ( सर्व फोटो सौजन्य : रवी जाधव इन्स्टाग्राम )
‘हे’ पहिलं लक्षण सांगतं तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो; ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, स्टेज १ मध्ये जाण्याआधी वेळीच व्हा सावध