-
‘मेट गाला २०२६’ च्या रेड कार्पेटवर हॉलीवूडसह बॉलीवूड मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांचा जलवा पाहायला मिळाला. याशिवाय भारतातील प्रसिद्ध बिझनेसमनच्या लेकीने सुद्धा यंदा Met Gala च्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं. सध्या तिच्या हटके लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.
-
बिझनेसमन कुमार बिर्ला यांची कन्या अनन्या बिर्ला एकदम हटके लूकमध्ये Met Gala च्या रेड कार्पेटवर पोहोचली होती. तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे पदार्पणातच अनन्याने खूप इम्प्रेसिव्ह लूक केला होता.
-
विशेषत: अनन्या बिर्लाने परिधान केलेल्या मेटॅलिक मास्कची सर्वत्र तुफान चर्चा होत आहे.
-
अनन्याचा ब्लॅक कॉउचर हटके आउटफिट रॉबर्ट वुन यांनी डिझाइन केला आहे.
-
स्ट्रक्चर्ड ब्लॅक रंगाचं आणि त्याला पांढरी बॉर्डर असलेलं जॅकेट, काळ्या रंगाचा प्लेटेड स्कर्ट या लूकमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत होती.
-
या लूकमध्ये अनन्या खूपच बोल्ड दिसतेय. याशिवाय तिच्या मेटॅलिक मास्कची देखील सर्वत्र चर्चा होत आहे. चमचे, वाट्या, छोटे डबे यांचा वापर करून हा हटके मेटॅलिक मास्क डिझाइन करण्यात आला आहे.
-
अनन्या आता ३१ वर्षांची असून तिची अंदाजित एकूण संपत्ती ₹१,००० कोटी ते ₹१,७७० कोटी इतकी आहे.
-
अनन्या बिर्ला आयपीएलमधील RCB संघाची प्रिन्सिपल पार्टनर म्हणूनही कार्यरत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची एक पॉप गायिका म्हणूनही ओळख आहे.
-
अनन्याच्या पोस्टवर बॉलीवूड सेलिब्रिटींनी सुद्धा कमेंट्स करत तिचं भरभरून कौतुक केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : अनन्या बिर्ला इन्स्टाग्राम )
ममता बॅनर्जींचा दारूण पराभव; भाजपाचे सुवेंदू अधिकारी १५ हजार मतांनी विजयी, भवानीपूरमध्ये भाजपाने कसे यश मिळवले?