-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री मयूरी देशमुखने नुकतेच तिचे पारंपरिक साडीतील सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
मयूरीने या फोटोंमध्ये लाल आणि जांभळ्या रंगाच्या मिश्रणाची एक आकर्षक सुती साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर तिने व्ही-नेक (V-neck) डिझाईनचा स्टायलिश ब्लाऊज परिधान करून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
दागिन्यांमध्ये तिने गळ्यात सोन्याचे नाजूक पेंडंट आणि कानात साजेसे झुमके घातले आहेत, जे अत्यंत मोहक दिसत आहेत.
-
हातामध्ये साडीला मॅचिंग असणाऱ्या काचेच्या हिरव्या आणि जांभळ्या बांगड्या तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवीत आहेत.
-
तिची हेअरस्टाईल विशेष लक्षवेधी असून, तिने केसांचा अंबाडा बांधून, त्यावर लाल गुलाबाची फुले माळली आहेत.
-
‘खुलता कळी कळेना’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली मयूरी नेहमीच आपल्या साध्या, पण प्रभावी लूकसाठी ओळखली जाते.
-
मयूरीने हिंदी मालिका ‘इमली’मध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: मयूरी देशमुख/इन्स्टाग्राम)
‘हे’ पहिलं लक्षण सांगतं तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो; ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, स्टेज १ मध्ये जाण्याआधी वेळीच व्हा सावध