-
सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजेच अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) आणि अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar).
-
आज प्रसादच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
या पोस्टमधील नम्रता व प्रसादच्या दाक्षिणात्य लूकने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
नम्रताने प्रसादबरोबरचे काही सुंदर फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
या फोटोंमध्ये नम्रताने पांढऱ्या रंगाची दाक्षिणात्य पद्धतीची साडी परिधान केली आहे, तर प्रसादने पांढरा शर्ट आणि लुंगी असा पारंपरिक वेश परिधान केला आहे.
-
नम्रता म्हणाली, “वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा पश्या! तुझ्यासारखा मित्र सगळ्यांना मिळो. तू तुझ्या कुटुंबाप्रमाणेच तुझ्या मित्रांनाही जपतोस. कामाप्रती तुझी निष्ठा अफाट आहे. तू एक उत्तम लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि आता निर्मातादेखील झाला आहेस. एकाच वेळी इतक्या भूमिका तूच लिलया पेलू शकतोस.”
-
सध्या नम्रता, प्रसादने लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
‘हे’ पहिलं लक्षण सांगतं तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो; ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, स्टेज १ मध्ये जाण्याआधी वेळीच व्हा सावध