-
उत्तर अमेरिकेतील सर्वांत मोठा मराठी चित्रपट महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘नाफा’ मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ (NAFA – Marathi International Film Festival 2025) सोहळ्याचे पडघम अजूनही सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत.
-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीने (Vaidehi Parashurami) नुकतेच या महोत्सवातील तिचे काही खास फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
-
वैदेहीने हे फोटो शेअर करताना ‘Major Throwback’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या सोहळ्यासाठी वैदेहीने गडद जांभळ्या रंगाचा डिझायनर वेलवेट ड्रेस परिधान केला होता.
-
वैदेहीच्या या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांनी पसंतीची पावती दिली आहे.
-
हा महोत्सव केवळ ग्लॅमरपुरता मर्यादित नव्हता, तर यात मराठी चित्रपटांचे जागतिक प्रीमियर, लघुपट स्क्रीनिंग आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळाली होती.
-
वैदेही केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही, तर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि साध्या राहणीमानासाठीही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)
Tamilnadu Election Results 2026 LIVE Updates : टीव्हीके प्रमुख विजय यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती