-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सध्या तिच्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
-
पूजाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर आणि हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पूजा सावंत काळ्या रंगाच्या डिझायनर गाऊनमध्ये अतिशय मोहक आणि स्टायलिश दिसत आहे.
-
पूजाच्या या गाऊनवर चंदेरी रंगाचे वर्क करण्यात आले असून, तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
आपला हा खास लूक तिने डायमंडची कर्णफुले परिधान करून पूर्ण केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना पूजाने, ‘उंच उभं राहणं म्हणजे कधीही न पडणं असं नाही, तर प्रत्येक वेळी पडल्यानंतर पुन्हा उभं राहणं होय,’ अशी प्रेरणादायी कॅप्शन दिली आहे.
-
पूजाचा हा हॉट आणि ग्लॅमरस लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
आपल्या अभिनयासोबतच पूजा तिच्या फॅशन सेन्सने नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य: पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
हाय ब्लड प्रेशरला त्रास आहे? मग रोज केवळ ‘इतकी’ मिनिटे चाला, डॉक्टरांनी फायदे