-
मराठी मनोरंजन विश्वातील अष्टपैलू अभिनेत्री समिधा गुरु (Samidha Guru) सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत आपल्या दमदार अभिनयाची मोहोर उमटवणारी समिधा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
-
नुकतेच समिधाचे काही नवीन फोटो समोर आले असून त्यात तिचा मराठमोळा अंदाज चाहत्यांना भुरळ घालत आहे.
-
या फोटोशूटसाठी समिधाने गडद निळ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली असून, त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
सोनचाफा प्रोडक्शनच्या ‘रूप दिगंबर स्वामी’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी समिधाने हा विशेष लूक केला होता.
-
या गाण्यातील समिधाच्या रूपाचे आणि सादरीकरणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
-
दरम्यान, अभिनयाच्या बाबतीतही समिधा मागे नाही; सध्या ती ‘भूमिका’ या गाजलेल्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समिधा गुरु/इन्स्टाग्राम)
हाय ब्लड प्रेशरला त्रास आहे? मग रोज केवळ ‘इतकी’ मिनिटे चाला, डॉक्टरांनी फायदे