-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने नुकतीच आपल्या घरी मोठ्या उत्साहात श्री सत्यनारायणाची पूजा केली.
-
या मंगलमयी प्रसंगी प्राजक्ताने परिधान केलेल्या सुंदर सोनेरी आणि चॉकलेटी रंगाच्या पैठणी साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
पारंपरिक साडीतील तिचा हा अस्सल मराठमोळा लूक सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
-
प्राजक्तासोबत तिचे पती शंभुराज खुटवड यांनीदेखील या धार्मिक विधीमध्ये सहभाग घेत मनोभावे पूजा-अर्चा केली.
-
फोटोंमध्ये प्राजक्ता आणि शंभुराज जोडीने देवासमोर हात जोडून बसलेले अतिशय आनंदी दिसत आहेत.
-
पूजेसाठी करण्यात आलेली केळीच्या पानांची आरास आणि फुलांची सजावट घरातील प्रसन्न वातावरणात भर घालत आहे.
-
प्राजक्ताने या लूकवर कपाळी लाल टिळा आणि नाजूक दागिने परिधान केले आहेत.
-
प्राजक्ता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली.
-
(सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
हाय ब्लड प्रेशरला त्रास आहे? मग रोज केवळ ‘इतकी’ मिनिटे चाला, डॉक्टरांनी फायदे