-
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राधा सागर (Radha Sagar) सध्या थायलंडच्या सफरनाम्याचा आनंद घेत आहे.
-
थायलंडमधील विलोभनीय समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य वातावरणात राधाने खास फोटोशूट केले असून तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
या सहलीदरम्यान राधाने समुद्राच्या अथांग पाण्याचा तळ अनुभवण्यासाठी ‘अंडरवॉटर सी वॉक’चा (Underwater Sea Walk) थरार अनुभवला.
-
पाण्याखालील हे मनमोहक दृश्य सोशल मीडियावर शेअर करताना तिने ‘Mermaid Mode ON’ असे कॅप्शन दिले आहे.
-
थायलंड हे तिथल्या निळ्याशार समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि चैतन्यमयी नाईटलाईफसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
-
मात्र राधासाठी ही सहल कामाबरोबरच करमणुकीचीही ठरली.
-
निमित्त होते ते म्हणजे ‘मराठी कलाकार क्रिकेट लीग’. या स्पर्धेसाठी राधा सध्या थायलंडमध्ये असून फावल्या वेळात ती तिथल्या पर्यटन स्थळांना भेटी देत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : राधा सागर/इन्स्टाग्राम)
“आयुष्यातील सर्वात वाईट दिवस…”, शाहिद कपूरने सांगितला ‘तो’ प्रसंग! ऐश्वर्या रायबरोबर ‘ताल’ सिनेमाचं शूट करताना…