-
अभिनेत्री भाग्यश्री सध्या सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असून, तिच्या एका नव्या लूकमुळे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.
-
रितेश देशमुख दिग्दर्शित बहुप्रतीक्षित ‘राजा शिवाजी’ चित्रपटात भाग्यश्री राजमाता जिजाऊंची ऐतिहासिक भूमिका साकारत आहे.
-
भाग्यश्रीने जिजाऊंच्या भूमिकेतील आपले नवीन फोटो शेअर केले असून, त्यामध्ये ती अत्यंत प्रभावशाली दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये भाग्यश्रीने गडद हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली असून, त्यावर लाल रंगाचा पदर तिचे सौंदर्य अधिक खुलवत आहे.
-
तिने परिधान केलेले पारंपरिक दागिने, विशेषतः ठुशी, कोल्हापुरी साज आणि नथ तिच्या राजमातेच्या लूकला पूर्णत्व देत आहेत.
-
या लूकसाठी तिने घातलेले सुवर्णालंकार आणि कपाळावरील कुंकू तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच दरारा निर्माण करीत आहे.
-
भाग्यश्रीने याआधी ‘मैने प्यार किया’सारख्या सुपरहिट चित्रपटाद्वारे घराघरात आपली ओळख निर्माण केली होती.
-
तिच्या या नव्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा तिचा अभिनय मोठ्या पडद्यावर, पण एका वेगळ्या ऐतिहासिक रूपात पाहायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: भाग्यश्री/इन्स्टाग्राम)
Numerology : विश्वासघातकी असतात ‘या’ २ मूलांकाचे लोक, यशस्वी होतात पण वाईट सवयींमुळे बिघडवतात नातेसंबंध